
जळगाव : जामनेर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील सोनबर्डी येथे नगरपरिषदेच्या जलतरण तलावात बघण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या १५ वर्षीय संकेत निवृत्ती पाटील (रा. हिवरखेडा रोड, जामनेर) याचा पाण्यात पडून मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संकेत हा आठवीच्या वर्गात शिकत असून तो जामनेर शहरात असलेल्या मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता.
जामनेर येथे सोनबर्डीच्या पायथ्याशी नगरपालिकेचा जलतरण तलाव आहे. तो बघण्यासाठी संकेत हा त्याच्या मित्रासोबत गेला होता. अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडायला लागला. तो दिसेनासा झाल्यामुळे नागरिकांनी तत्काळ जामनेर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. तर पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

वॉशिंगटन : अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांना भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच करायचे आहे. मात्र, भारत सरकार काही ...
आरोग्यदूत जालमसिंग राजपूत व सोबत एक तरुण यांनी संकेतला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु काही वेळाने संकेतचा मृतदेह हाती लागला, अशी माहिती मिळाली. कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या जलतरण तलावमध्ये नुकतेच पाणी भरण्यात आले होते. जलतरण तलाव चालू करण्यासाठी हे प्रयत्न होते. परंतु त्या अगोदर ही दुर्दैवी घटना घडली.