Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीElon Musk : एलॉन मस्कनी भारताच्या सर्व अटी केल्या मान्य, लवकरच सुरु...

Elon Musk : एलॉन मस्कनी भारताच्या सर्व अटी केल्या मान्य, लवकरच सुरु होणार स्टारलिंक सेवा

वॉशिंगटन : अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांना भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सेवा लाँच करायचे आहे. मात्र, भारत सरकार काही केल्या त्यांना परवानगी देत नव्हते. अखेर मस्क यांनी नमते घेतले असून मस्क यांनी भारताच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्टारलिंकचा भारतातील सेवा सुरु करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांच्या स्टारलिंक लाँच करण्यासाठी भारत सरकारने कोणतीही सूट दिलेली नाहीय. त्यामुळे सरकारच्या अटी मान्य करत स्टारलिंक त्याच्या ध्येयाच्या आणखी जवळ आला आहे. सरकारच्या सर्व अटी आपल्याला मान्य असल्याचे पत्र मस्क यांच्या स्टारलिंकने केंद्राकडे सुपूर्द केले आहे. यानंतर आता स्टारलिंकला स्पेक्ट्रम वाटप केले जाणार आहे. त्याची बीटा चाचणी देखील आता सुरु केली जाणार आहे. स्टारलिंकच्या मदतीने स्मार्टफोन युजर्सना मोबाईल टॉवरशिवाय फोन सेवा उपलब्ध होणार आहे. स्टारलिंक स्मार्टफोन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे.

पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर, ५ फेब्रुवारीला कोकण म्हाडाची लॉटरी काढणार

गेल्या काही महिन्यांपासून, स्टारलिंक सातत्याने आपले सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्क वाढवत आहे. TweakTown च्या अहवालानुसार, वापरकर्ते आता २५०-३०० Mbpsच्या वेगाने इंटरनेट वापरू शकतात. एलॉन मस्कचे हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य नक्कीच पूर्णपणे बदलून जाईल याचा दूरसंचार उद्योगावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने सॅटेलाइट स्पेक्ट्रम आणि त्याच्या किंमतीची प्रक्रिया आधीच अंतिम केलेली आहे. यामुळे भारतात लवकरच उपग्रह सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अमेझॉनची Kuiper ही सॅटेलाईट सर्व्हिसही उतरण्याची शक्यता आहे. जिओ आणि एअरटेलही या स्पर्धेत येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणते अपडेट हाती आलेले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -