Friday, May 9, 2025

महामुंबईक्रीडाताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Jasprit Bumrah : बुमराहने कोरलं 'आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारावर नाव

Jasprit Bumrah : बुमराहने कोरलं 'आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्कारावर नाव

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०२४ वार्षिक पुरस्कारांच्या सर्व विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहला आयसीसी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयरसाठी प्रतिष्ठित सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयरसाठी ४ खेळाडू शर्यतीत होते, ज्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह इंग्लंडचा फलंदाज जो रूट, हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश होता. हा पुरस्कार जिंकून बुमराहने हे सिद्ध केले आहे की तो सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून का गणला जातो.बुमराह हा भारतासाठी हा पुरस्कार जिंकणारा पाचवा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली यांनाही आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आहे.



बुमराहने भारतीय संघाला २०२४ मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने स्पर्धेत ४. ७ च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने १५ विकेट्स घेतल्या. रेड बॉलच्या क्रिकेटमध्येही बुमराहने १३ सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेतल्या. २०२४ च्या कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर होता. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये बुमराहने ३२ विकेट्स घेतल्या.ज्यासाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा किताब देण्यात आला. ३१ वर्षीय बुमराहने आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कारही जिंकला.

Comments
Add Comment