

Saif Ali Khan Attack Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता एका बांगलादेशी महिलेला अटक
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. ...
आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद बांगलादेशमध्ये हलक्या वजनाच्या श्रेणीत (लाईट वेट) जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवर कुस्तीच्या स्पर्धांमध्ये भाग घेत होता. पण खेळातून मिळणाऱ्या पैशांवर भागत नव्हते. जास्त पैशांची गरज होती. आर्थिक अडचणी वाढू लागल्यामुळे मोहम्मदने भारतात येऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या नोकरी दरम्यान एका रिक्षावाल्याशी गप्पा मारताना मोहम्मदला सेलिब्रेटींच्या घरी दरोडा टाकण्याची कल्पना सुचली. यानंतर मोहम्मदने मुंबईत फिरुन शाहरुख खान, सैफ अली खान यांच्यासह निवडक सेलिब्रेटींच्या घरांची लांबून पाहणी केली होती. कोणत्या घरात कोणत्या मार्गाने प्रवेश करावा याचे नियोजन करण्यासाठी मोहम्मदने वेगवेगळ्या भागांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते.

Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत स्थायिक होणार!
मुंबई : एकीकडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटाचं सत्र सुरु आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता बॉलीवूडची ...
मोहम्मद भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता. या नोकरीत असतानाच त्याला गुन्हा करण्याची कल्पना सुचली. सैफच्या घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मोहम्मदने घरातून बाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत अखेर ठाणे गाठले. या दरम्यान मोहम्मदने वारंवार कपडे बदलले होते. पण पोलिसांनी हाती आलेल्या माहितीच्या मदतीने मोहम्मदला ठाण्याच्या कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडुपातून अटक केली. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील ‘रिकीज’ बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.

Chhava Movie Controversy : 'छावा' चित्रपटातील वादग्रस्त 'लेझीम नृत्याचा' सीन काढणार
मुंबई : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचं सगळीकडून कौतुक केलं जात आहे. मात्र ...
बोटांचे ठसे
काही दिवसांपूर्वी सैफच्या घरातून मिळालेले बोटांचे ठसे आणि आरोपीच्या बोटांचे ठसे एकमेकांशी मिळतेजुळते नाहीत असे वृत्त आले होते. पण आता आरोपीविरोधात पुरेसे परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे उपलब्ध असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम क्षेत्र) परमजीत सिंग दहिया यांनी सांगितले.