Thursday, June 19, 2025

‘आर्या ओम्नीटॉक’ विश्वासार्ह जीपीएस सोल्युशन पुरविणारी कंपनी

‘आर्या ओम्नीटॉक’ विश्वासार्ह जीपीएस सोल्युशन पुरविणारी कंपनी
मुंबई : टेलीमॅटिक्स उद्योगात वीस पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या आर्या ओम्नीटॉकने आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक क्षेत्रात आयओटी आणि जीपीएसचा वापर वाढला असून त्यामध्ये या क्षेत्राला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. साहजिकच ‘आर्या ओम्नीटॉक’सारखी विश्वासार्ह जीपीएस सोल्युशन पुरविणारी कंपनी एकमेव ठरत आहे.



लॉजिस्टिक्स, घातक रसायनांची व नाशवंत अन्नपदार्थांची वाहतूक, कर्मचारी वाहतूक, कोणत्याही मालाचे कार्यक्षम वितरण अशा प्रत्येक क्षेत्रात ‘आर्या ओम्नीटॉक’च्या जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस आणि ‘फ्लीट विझिल’ या एसएएएस-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे पारंपरिक ट्रॅकिंगच्या पलीकडे जाऊन काम केले जाते. कंपनीची ही सोल्युशन्स फ्लीट ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी, सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक परतावा देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहेत.



आर्या ओम्नीटॉक’चे सीओओ व सीटीओ सौमिल ध्रू यांनी सांगितले की “प्रत्येक ग्राहकाच्या विशिष्ट गरजांनुसार त्याला खास प्रकारची सोल्युशन्स देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. उद्योगातील सर्व क्षेत्रांसाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि ऑप्टिमाइज्ड वाहतूक व्यवस्था साकार करण्याकरीता आम्ही आमचा काळानुरुप सिद्ध झालेला, अतिशय विश्वासार्ह आयओटी प्लॅटफॉर्म उपयोगात आणत असतो."



वाहनांमध्ये एआयएस १४० जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसविल्यामुळे भारतातील वाहतूक आणि रस्ते सुरक्षेच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येत आहे. या उपकरणांबाबत खुद्द केंद्र सरकारनेच आदेश दिलेला असल्याने व्यावसायिक वाहनांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून येत असून सुरक्षेच्या उच्च मानकांची अंमलबजावणी करण्यात आणि एकंदर वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यात हा आदेश क्रांतिकारक ठरणार आहे.
Comments
Add Comment