मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने भारतात नवीन ऑडी आरएस क्यू ८ परफॉर्मन्ससाठी बुकिंगला सुरुवात केली. ही एसयूव्ही ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्ट’ अॅप्लीकेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपये देऊन बुक करता येऊ शकते. ६४० एचपी शक्ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे शक्तिशाली ४.० लीटर व्ही८ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स फक्त ३.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करू शकते आणि ऑप्शनल पॅकेजसह अव्वल गती ३०५ किमी/तास आहे. नवीन ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव देते, असे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले.
‘ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स’चे बुकिंग सुरू
