रेडिओ क्लब येथे सुसज्ज आणि दर्जेदार जेट्टी उभारावी – मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे

मुंबई : मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ उभारण्यात येणाऱ्या नवीन जेट्टीचे काम दर्जेदार आणि सर्व सोयींनी युक्त करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


बंदरे विकास मंत्री श्री राणे यांनी रेडिओ क्लब येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. प्रदीप, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढिये, मुख्य अभियंता राजाराम पुरी गोसावी, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन खरा, मुख्य सागरी अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता श्रीकांत बांगर आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.



रेडिओ क्लब येथील जेटी ही प्रवाशांसोबतच पर्यटनासाठी उपयुक्त असणार असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, या जेटीचे काम लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांच्या परवानग्या लवकरात लवकर मिळवाव्यात. येथे निर्माण होणाऱ्या सोयी-सुविधा दर्जेदार असाव्यात. या नवीन जेटीमुळे सध्याच्या जेटीवरील ताण कमी होणार आहे. याचा विचार करून याचे काम करावे अशा सूचनाही श्री. राणे यांनी दिल्या.



यावेळी बंदरे विकास मंत्री श्री. राणे यांनी गेट वे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब परिसराची पाहणी केली आणि कामाची सविस्तर माहिती आणि सद्यस्थिती जाणून घेतली.


रेडिओ क्लब येथे प्रवासी आणि पर्यटन यासाठी टर्मिनल इमारतीसह इतर सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये ८० मीटर बाय ८० मीटरचा टर्मिनल प्लॅटफॉर्म, टर्मिनल इमारत, २१४ मीटर लांब आणि १२ मीटर रुंद जेटी, ३५० लोकांची क्षमता असलेले अँफिथियेटर, प्रतीक्षालय, प्रसाधनगृह, पाणपोई, अग्नी सुरक्षा प्रणाली, सीसीटिव्ही यंत्रणा यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक