पुणे : दुकानातील वस्तूंचा खप व्हावा तसेच दुकान नावारूपाला येण्यासाठी विक्रेते नेहमीच अनोखी शक्कल लढवत असतात. कधी सेल लावून तर कधी कमी किंमतीत वस्तू विकून ग्राहकवर्ग खेचून आणतात. काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतील एका दुकानात तब्बल १० रुपयांना साड्या विकल्या जात होत्या. याची मोठी जाहिरात देखील केली गेली होती. त्यानुसार लांबपल्ल्याच्या महिलांनी देखील या दुकानाबाहेर गर्दी केली होती. दिवसदिवसभर उन्हात उभं राहून या महिलांना फक्त १० रुपयाला एक साडी मिळाल्यानंतर महिला संतापल्या होत्या. तरीही दुकानाबाहेरची गर्दी काही कमी झालीच नव्हती.
खेडच्या राजगुरूनगर शहरात देखील असाच प्रकार घडला आहे. राजगुरूनगर परिसरात एका दुकानदाराने एक रुपयात कुर्ती अशी ऑफर देऊन गर्दी झाल्यावर दुकान बंद करून पळ काढल्याचा प्रकार घडला आहे. खरेदीसाठी महिलांनी ४- ५ तास रांगेत उभ्या राहिल्यानंतर आक्रमक होऊन दुकानाबाहेरच आंदोलन सुरु केले.
Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत स्थायिक होणार!
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील राजगुरूनगर शहरात एका दुकानदाराने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी खास १ रुपयाची कुर्ती अशी जाहिरात केली. मोठ्याप्रमाणावर जाहिरातबाजी केल्यानंतर रविवारी सकाळी दुकान उघडताच महिलांची झुंबड उढाली. महिलांनी एकमेकांसोबत संपर्क साधून दुकानाबाहेर गर्दी केली. ४- ५ तासापेक्षा अधिक वेळ रांगेत उभे राहून कुर्ती मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या.
दुकानदाराच्या विरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी केली. दुकानदाराने दुकान बंद केल्याने महिला आणखी आक्रमक झाल्या. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे महिलावर्ग शांत झाल्या. पोलीस दुकानदाराचा अधिक तपास करत असून पोलिसांनी दुकानदाराशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे.