Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Police Bharti 2025 : वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! राज्यात १० हजार पोलिसांची भरती

Police Bharti 2025 : वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण! राज्यात १० हजार पोलिसांची भरती

मुंबई : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी (Police Bharti 2025) समोर आली आहे. राज्यात १० हजार पदांसाठी भरतीप्रक्रीया राबवण्यात येणार आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही भरती सुरु होणार आहे.



कशी असेल पोलीस भरती?



  • पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यांसाठी काही पात्रता आणि निकषांची पूर्ति करावी लागणार आहे. यानंतर पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा, शारीरिक तपासणी आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात.

  • सर्वप्रथम उमेदवारांना ग्राउंड परीक्षेसाठी बोलावले जाते. त्यात उत्तीर्ण झाल्यावरच लेखी परीक्षा घेतली जाते. पोलिस भरतीसाठी तयारी करताना तरुणांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

  • पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा ठरलेले असते. पुरुष उमेदवाराची उंची १६५ सेंटीमीटर असावी. तर महिला उमेदवाराची उंची १५५ सेंटीमीटर असावी. तर छाती ७९ सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी.

Comments
Add Comment