Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीBaghpat Stage Collapse : उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवातील ६५ फूट उंच स्टेज कोसळले!

Baghpat Stage Collapse : उत्तरप्रदेशात निर्वाण महोत्सवातील ६५ फूट उंच स्टेज कोसळले!

७ भाविकांचा मृत्यू, ७५हून अधिक जण जखमी

बागपत : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बागपत जिल्ह्यातील बडौत येथे आज मोठा अपघात झाला. जैन निर्वाण महोत्सवासाठी उभारलेला स्टेज कोसळल्याने ७ भाविकांचा मृत्यू झाला. तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जखमींना ई-रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले.

Online Fraud : डिजिटलच्या नावावर बनावटी घड्याळ! फ्लिपकार्ट ऑनलाईन खरेदीत फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, बागपतच्या बरौतमध्ये भगवान आदिनाथांच्या निर्वाण लाडू उत्सव आयोजित करण्यात आला होता. यासाठी श्री दिगंबर जैन महाविद्यालयाच्या मैदानावर ६५ फूट उंच स्टेज बांधण्यात आले होते. मात्र स्टेजच्या पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे भर उत्सवात स्टेजची पडझड झाली असून घटनास्थळी भाविकांची मोठी चेंगराचेंगरी झाली.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बडौत कोतवाली निरीक्षकही पोलिस दलासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत ७५ हून अधिक लोक जखमी झाले असून जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -