वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली.यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक सुधारण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, पीएम मोदी यांच्याशी फोनवरुन झालेल्या सकारात्मक संवादानंतर ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे.
दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांची मोदींसोबतची ही पहिलीच चर्चा होती.यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंध अधिक उंचीवर नेण्याचा आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला.तसेच पीएम मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेला भेट देणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासाठी भारत योग्य ती पावले उचलेल असे ट्रम्प म्हणाले आणि त्यांनी मोदींशी इमिग्रेशनवर चर्चा केली.
दरम्यान, पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी आणि ट्रम्प यांनी तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. पश्चिम आशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीसारख्या जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी लवकरच भेट घेण्याचे मान्य केले आहे, तथापि, ट्रम्प प्रशासनाने भारतासोबतच्या संबंधांबाबत संमिश्र संकेत दिले आहेत
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…