Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदी लवकरच करणार अमेरिका दौरा, ट्रम्प यांची घोषणा

पंतप्रधान मोदी लवकरच करणार अमेरिका दौरा, ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली.यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक सुधारण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिका दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, पीएम मोदी यांच्याशी फोनवरुन झालेल्या सकारात्मक संवादानंतर ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे.

दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांची मोदींसोबतची ही पहिलीच चर्चा होती.यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका संबंध अधिक उंचीवर नेण्याचा आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला.तसेच पीएम मोदी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेला भेट देणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत घेण्यासाठी भारत योग्य ती पावले उचलेल असे ट्रम्प म्हणाले आणि त्यांनी मोदींशी इमिग्रेशनवर चर्चा केली.

दरम्यान, पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी आणि ट्रम्प यांनी तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. पश्चिम आशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीसारख्या जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी लवकरच भेट घेण्याचे मान्य केले आहे, तथापि, ट्रम्प प्रशासनाने भारतासोबतच्या संबंधांबाबत संमिश्र संकेत दिले आहेत

Comments
Add Comment