
मध्यप्रदेशच्या हरपालपूर रेल्वे स्थानकावरील घटना
छत्तरपूर : महाकुंभा दरम्यारन एक धक्कापदायक घटना समोर आली आहे. प्रयागराजला निघालेल्या रेल्वेलवर जमावाने हल्लान केल्याचे समोर आले आहे. ही घटना मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील हरलापूर स्टेशनवर घडली. अचानक झालेल्या तोडफोडीमुळे रेल्वेतील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

अमरावती : फ्लिपकार्टच्या (Flipkart) माध्यमातून ऑनलाईन अॅपल कंपनीचे डिजिटल घड्याळ बोलाविले. परंतु डिजिटल घड्याळच्या नावावर बनावटी घड्याळ आल्याचे स्पष्ट ...
यासंदर्भातील माहितीनुसार झाशी मंडलच्या हरपालपूर स्थानक परिसरात या रेल्वेवर इतक्याह भयावह प्रकारे हल्ला करण्यात आला की, रेल्वेेच्या बोगीमध्ये बसलेल्याे प्रवाशांमध्ये कल्लोपळ माजला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्याो व्हिडिओमध्ये लोकांचा मोठा समुह अचानक गर्दीत सामील झाला अन् रेल्वेच्या बोगीवर दगडफेक करू लागला. लोकांची ही गर्दी रेल्वेत घुसण्याचा प्रयत्न करत होती. पण जेंव्हा लोकांना रेल्वेत आत जाता येईना तेंव्हा लोकांनी रेल्वेच्या बोगीच्या दरवाजे आणि खिडक्यांचा काचा फोडल्यात. प्रयागराजमध्ये उद्या, बुधवारी मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये स्नानासाठी पोहचण्याची शक्यता आहे. रेल्वेंवर अशा प्रकारे झालेल्याे हल्ल्यामुळे रेल्वे सुरक्षेच्या मुद्यावरून टीका केली जात आहे. महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर उत्तलर प्रदेशच्या सरकारने कडेकोट बंदोबस्ते ठेवला आहे. कुंभ नगरी प्रयागराजमध्ये ठिक-ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. सोबतच प्रशासकीय अधिकारीही परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.