
मुंबई: भारत आणि इंग्लंंड(IND vs ENG) यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग विजयी हॅटट्रिक लगावत भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल.
तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मात्र अद्याप या मालिकेत विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकत इंग्लंडचा संघ या मालिकेत रंजकता आणण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २ विकेटनी विजय मिळवला होता. या सामन्याचा हिरो तिलक वर्मा ठरला होता. भारताचा तिसरा सामना आता राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ११ची घोषणा करण्यात आली.

मुंबई : आयसीसीने सोमवारी (२७ जानेवीरी) वनडेतील सर्वोत्तम महिला आणि पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. यादरम्यान, भारतासाठीही ...
तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडचा संघ सुरूवातीचे दोन सामने हरले आहेत. या दोन्ही पराभवानंतरही बटलरने प्लेईंग ११मध्ये बदल केलेला नाही.
राजकोटमध्ये असा आहे भारताचा रेकॉर्ड
भारताने हा तिसरा सामना जिंकला तर ही मालिका त्यांच्या नावावर होईल. या पद्धतीने ते इंग्लंडविरुद्ध सलग ५वी टी-२० मालिका जिंकतील. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ८ द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवण्यात आली आहे. यात भारतीय संघाने ४ मालिका जिंकल्या तर ३ गमावल्या आहेत. एक मालिका अनिर्णीत राहिली.