ठाणे : ठाण्यातील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग (Hyper City Mall) लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही आग लागली असून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही मॉल मधील काही दुकानांना आगीचा फटका बसला आहे.
Online Gaming Sucide News : ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून १७ वर्षीय तरुणीने केला जीवनाचा अखेर
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलमधील पुमा बूट्सच्या शोरूममध्ये आग लागली. यावेळी दुकानातून आगीचे व धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगर पालिकेचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने तातडीने बचावकार्य सुरु केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, ते अद्यापही स्पष्ट झाले नाही.