नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यावरून काही उलगडे होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Dombivli News : डोंबिवलीत हळदी कुंकूच्या कार्यक्रमावरून मराठी आणि अमराठी भाषिक वाद शिगेला
‘ब्लू व्हेल’सारख्या प्राणघातक खेळांमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच आता एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केली आहे. नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हि तरुणी इंटरनेटवर मृत्यूबाबत वाचायला लागली. मृत्यूनंतर काय होते, याची उत्सूकता तिला निर्माण झाली. ती रशियन संस्कृतीबाबतही इंटनेटवरून माहिती घेत होती. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं पोलिसांचा दावा आहे. मात्र तिच्या आत्महत्येमागचं ठोस कारण अद्यापही समोर आलं नसून रविवारी रात्रीच्या सुमारास ती ऑनलाईन गेम खेळत होती. सोमवारी सकाळी पालक उठल्यावर मुलगी काहीच प्रतिसाद देत नसल्याने तिच्या खोलीत गेले असता तिथे त्यांना ती रक्त बंबाळ अवस्थेत सापडली.मिळालेल्या माहितीनुसार आधी चाकूने हातावर क्रॉसचे चिन्ह काढले. त्यानंतर तिने नस कापली. नस कापल्यानंतर तिने चाकूने गळा चिरला. आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.