Bollywood Drama Queen : ड्रामा क्वीन आता पाकड्याशी लग्न करणार; दुबईत स्थायिक होणार!

मुंबई : एकीकडे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये घटस्फोटाचं सत्र सुरु आहे. त्याचबरोबर दुसरीकडे अनेक सेलेब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता बॉलीवूडची ड्रामा क्वीन ओळख असलेली राखी सावंत सुद्धा लवकरच तिसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. राखी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीत चर्चेत असते. राखीने तिच्या अलिकडच्या प्रवासादरम्यान मिळालेल्या चांगल्या लग्नाच्या मागण्यांबद्दलही सांगितलंय. पण यावेळेस तिला लग्न भारतात करायचं नसून पाकिस्तानात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.



एका माध्यमाशी बोलताना राखी म्हणाली, "मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि माझे चाहतेही तिथे आहेत. अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडप्यांनी लग्न केलं आहे आणि ते अमेरिका आणि दुबईमध्ये स्थायिक झाले असून चांगलं जीवन जगत आहेत. या प्रकारच्या विवाहामुळे दोन्ही देशांमधील शांतता आणि समजूतदारपणा वाढतो. मला पाकिस्तानकडून खूप प्रस्ताव येत आहेत. जेव्हा मी पाकिस्तानला गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की, माझ्या मागील दोन्ही लग्नांमध्ये माझा किती छळ झाला होता. भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करू शकत नाहीत. प्रियकर दोदी खानबद्दल बोलताना राखी म्हणाली की, तो एक अभिनेता आणि सोबतच एक पोलिस अधिकारी सुद्धा आहे. राखी म्हणाली, 'लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात होईल, हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ आणि दुबईत स्थायिक होऊ."


राखीच्या या विधानानंतर तिचे चाहते खुश झाले आहेत. दरम्यान आता राखीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता