वसई : वसईच्या कोपर गावात क्रिकेट खेळताना एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील मैदानावर क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.तरुणाला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर वझे असे या मृत क्रिकेटपटूचे नावं आहे. तो अवघा २७ वर्षांचा होता. चांगला खेळाडू अशी सागर वझेची पंचक्रोशीत ओळख होती. शुक्रवारी संध्याकाळी गावच्या पोरांच्यात सामना सुरू झाला. सचिन सामना खेळण्यासाठी मैदानात पोहोचला.सचिनने सामन्यात दोन बॉलवर दोन सिक्स मारले. त्यानंतर तिसरा सिक्स मारण्याची मागणी प्रेक्षकांकडून होऊ लागली. पण तिसरा सिक्स मारण्यासाठी पुढे आला आणि त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
One Rupee Kurti Offer : १ रुपयात कुर्ती, महिलांच्या लागल्या रांगा; दुकानदाराने काढला पळ
सागर जागीच कोसळला आणि उपचारासाठी दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. सागरला यापूर्वीही एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. डॉक्टरांनी त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, क्रिकेटवरील प्रेमापोटी त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली आणि दुर्दैवाने खेळतानाच त्याने प्राण सोडला.