Online Gaming Sucide News : ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून १७ वर्षीय तरुणीने केला जीवनाचा अखेर

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यावरून काही उलगडे होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



'ब्लू व्हेल'सारख्या प्राणघातक खेळांमुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशातच आता एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केली आहे. नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हि तरुणी इंटरनेटवर मृत्यूबाबत वाचायला लागली. मृत्यूनंतर काय होते, याची उत्सूकता तिला निर्माण झाली. ती रशियन संस्कृतीबाबतही इंटनेटवरून माहिती घेत होती. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं पोलिसांचा दावा आहे. मात्र तिच्या आत्महत्येमागचं ठोस कारण अद्यापही समोर आलं नसून रविवारी रात्रीच्या सुमारास ती ऑनलाईन गेम खेळत होती. सोमवारी सकाळी पालक उठल्यावर मुलगी काहीच प्रतिसाद देत नसल्याने तिच्या खोलीत गेले असता तिथे त्यांना ती रक्त बंबाळ अवस्थेत सापडली.मिळालेल्या माहितीनुसार आधी चाकूने हातावर क्रॉसचे चिन्ह काढले. त्यानंतर तिने नस कापली. नस कापल्यानंतर तिने चाकूने गळा चिरला. आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Chatrapati Sambhajinagar Police Bharti : सॅण्डलवर धावत ५ किमी पूर्ण; जिद्दीला दाद देत अधिकाऱ्यांनी गिफ्ट केले.....

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान एका उमेदवाराची जिद्द आणि मेहनत

पाषाण तलावात हजारो माशांचा मृत्यू; पुणे महापालिका आयुक्तांचा दणका; ४ अधिकारी निलंबित, मुख्य अभियंत्याला नोटीस!

पुणे : पुण्यातील निसर्गरम्य पाषाण तलावात (Pashan Lake) मोठ्या प्रमाणावर मासे आणि जलचरांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना

Govt Job : २३ वर्षांची प्रतीक्षा संपली! महिला व बाल विकास विभागात ८,६६९ पदांची मेगाभरती; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागात तब्बल दोन दशकांनंतर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या २३

Earthquake Parbhani and Nanded : मोठी बातमी: मराठवाडा हादरला! परभणी आणि नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे; पत्रे हलल्याने भीतीचे वातावरण

नांदेड : विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात आज सकाळी ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परभणी,

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त

Nashik : नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना शासनाचा मदतीचा हात

नाशिक : अवकाळी पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने