Smartphone: किती वेळ स्मार्टफोन वापरल्याने खराब होतात डोळे? जाणून घ्या

मुंबई: आजकाल अधिकतर लोकांकडे स्मार्टफोन आहे. घरात लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन दिसतात.खासकरून मुले अधिक स्मार्टफोनचा वापर करत असल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की स्मार्टफोनच्या किती वापरामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचू शकते.

स्मार्टफोनचा वापर


एका सर्वेक्षणानुसार भारतात केवळ २४ टक्के लोकांकडे स्मार्टफोन आहेत. तर ४० टक्के लोक मोबाईल फोनचा वापर करतात. संचार तसेच ग्रामीण विकास राज्य मंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी गेल्या वर्षी लोकसभे एका प्रश्नावर लिखित उत्तरात सांगितले की देशात ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६४४१३१ गावांमध्ये साधारण ६,२३, ६२२ गावांमध्ये मोबाईल कव्हरेज आहे. देशात मोबाईलचा वापर करणाऱ्यांची संख्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ११५.१२ कोटी झाली आहे.


किती वेळ मोबाईलचा वापर केला पाहिजे


आता प्रश्न हा आहे की मोबाईल फोनचा वापर किती वेळ केला पाहिजे. आजच्या काळात लोकांचा अधिकतर वेळ मोबाईलमध्ये जात असल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत आहे. तर तज्ञांनुसार मोबाईलचा वापर दिवसभरातून २ तासांपेक्षा अधिक करू नये. याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. इतकंच नव्हे सातत्याने मोबाईल फोन पाहू नये. जर तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर डोळ्यांपासून कमीत कमी १८ इंच दूर ठेवला पाहिजे.


मोबाईल फोनचा अधिक वापर तुम्हाला आजारी पाडू शकतो. मोबाईलमधून रेडिएशन्स निघत असतात. दीर्घकाळ अशा गोष्टींच्या संपर्कात राहिल्याने कॅन्सरची शक्यता वाढते. याशिवाय मोबाईल फोन जवळ ठेवून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का याबाबत संशोधन सुरू आहे.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि