Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीSaif Ali Khan : सैफवर हल्ला केला नाही तरी नोकरी गेली, लग्न...

Saif Ali Khan : सैफवर हल्ला केला नाही तरी नोकरी गेली, लग्न मोडलं, एका फोटोमुळे आयुष्याची वाट लागली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून छत्तीसगडमध्ये एका तरुणाला पकडण्यात आले होते. पण ही कारवाई होऊन २४ तास होण्याआधीच मुंबई पोलिसांनी ठाण्यातून सैफवर हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली. यानंतर छत्तीसगडमध्ये पकडलेल्या तरुणाला हल्ल्याशी संबंध नाही असे सांगत घरी पाठवण्यात आले. या तरुणाने हल्ला केलाच नव्हता. पण त्याला पकडल्याची माहिती काही तासांपूर्वी माध्यमांना मिळाली आणि तरुणाचा फोटोही मिळाला होता. सैफशी संबंधित विषय असल्यामुळे अनेक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दाखवताना फोटो दाखवला होता. पोलिसांनी माध्यमांना दिलेला हा फोटोच छत्तीसगडमधील तरुणाच्या आयुष्याची वाट लावण्यास कारणीभूत ठरला. सैफवर हल्ला केला नसूनही फक्त फोटोमुळे तरुणाचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले.

विद्यर्थिनीने शिक्षकांकडे सॅनिटरी पॅड मागितले आणि…

बातमीत तरुणाचा फोटो बघितल्यावर मालकाने त्याला नोकरीवरुन काढले. ज्या मुलीशी लग्न ठरत होते, त्या मुलीच्या घरच्यांनी लग्नासाठी पुढची बोलणी करण्यास नकार दिला आणि परस्पर लग्न मोडल्याचे कळवले. या लागोपाठच्या घटनांमुळे सैफवर हल्ला केला नसूनही तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरुणाला आणि त्याच्या घरच्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मालकाला वारंवार समजावून सांगितले तरी अद्याप तरुणाला त्याची गेलेली नोकरी परत मिळालेली नाही. मोडलेले लग्न आता पुन्हा कसे जुळणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरुणाला सापडलेले नाही. वैतागलेल्या तरुणाने आता मुंबईत सैफच्या इमारतीसमोर जाऊन नोकरी मागणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली.

अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला झाला. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. फूटेजमध्ये एक व्यक्ती अवघ्या काही सेकंदांपुरती दिसली होती. या फूटेजवरुन मिळत्याजुळत्या चेहऱ्याच्या अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकारात हल्लेखोर नसूनही संशयित म्हणून छत्तीसगडमधील तरुणाला अटक झाली होती. छत्तीसगडमध्ये पकडलेल्या तरुणाचा फोटो यस झाला आणि त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. नाहक मनस्तापाला सामोऱ्या गेलेल्या आकाश कनोजियाचे लग्न मोडले. शिवाय त्याची नोकरीही गेली. या दुहेरी फटक्यातून कसे सावरावे हा प्रश्न आता त्याला आणि त्याच्या घरच्यांना सतावत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -