उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विद्येच्या मंदिरात विद्यार्थिनीने शिक्षकांकडे सॅनिटरी पॅड मागितल्यावर शिक्षकांनी विद्यार्थिनीला शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रशासनाने याची दखल घेतली आहे.
लखनऊच्या एका शाळेत ११वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला परीक्षा देत असतानाच पाळी आली. सॅनिटरी पॅड तिच्याकडे नसल्याने तिने शिक्षकांजवळ सॅनिटरी पॅड मागताच शिक्षकांनी दुर्लक्ष केले. आणि विद्यार्थिनीला वर्गाच्या बाहेर उभं राहण्यास सांगितले. हा प्रकार शनिवारी घडला असून विद्यर्थीनीच्या वडिलांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध जिल्हा आयोगासह जिल्हा मॅजिस्ट्रेट आणि जिल्हा विद्यालय निरीक्षकांकडे तक्रार केली आहे. तपासाच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. तर शाळा प्रशासनाकडे योग्य कारवाईची मागणी केली आहे.