
मुंबई : मुंबईतील विक्रोळी भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळीत दोन तरुण प्रेमी युगुलाने आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दोघांनी धावत्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली.

पुणे : HMPV नंतर गुलेन बॅरी सिंड्रोम ( GBS ) या आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात या आजाराच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यात रविवारी या ...
काल (दि २६) रोजी दुपारच्या सुमारास एका तरुण प्रेमी युगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली. घरातून लग्नाला नकार देत असल्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील मुलीचे वय १५ असून ती परप्रांतीय आहे तर मुलाचं वय १९ असून तो महाराष्ट्रीयन आहे. ही मुलगी भांडुप येथील हनुमाननगर मध्ये राहत असून ती रविवारी दुपारच्या सुमारास घरातून आजीसोबत बाहेर निघाली मात्र आजीचा डोळा चुकवून ती गायब झाली. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलीस तिचा शोध घेत होते. मात्र, काही वेळाने रेल्वे पोलिसांनी भांडुप पोलिसांशी संपर्क साधला आणि थेट तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.
या प्रेमी युगुलांनी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान या प्रेमी युगुलांनी आत्महत्या जातीवादातून केली की यामागे अजून काही कारण असेल याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.