पुणे : भोर – महाड मार्गावर वरंध घाटात अपघात झाला. कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी पोलिसांच्या सहकार्याने मदतकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
पुण्यातील भोर – महाड मार्गावर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वरंध घाटात अपघात झाला. इको कार महाडहून पुण्याच्या दिशेला जात होती. कार उंबरठे गावाजवळच्या रस्त्यावरुन पुढे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाला असून बाकी ८ जण गंभीर जखमी आहेत.
Saif Ali Khan : सैफवर हल्ला केला नाही तरी नोकरी गेली, लग्न मोडलं, एका फोटोमुळे आयुष्याची वाट लागली
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढलं. जखमींना तात्काळ दरीतून बाहेर काढून, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचाव कार्य केले. पोलीस अपघात प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.