Monday, February 10, 2025
Homeक्रीडारोहित शर्माची मुंबई रणजी ट्रॉफीतून माघार

रोहित शर्माची मुंबई रणजी ट्रॉफीतून माघार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल १० वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळले. मुंबईच्या संघाकडून खेळताना तो दोनही डावात फारशी चमक दाखवू शकला नाही. याआधी भारतीय संघात आणि मग मुंबई रणजीमध्ये अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने अखेर नाईलाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

वृत्तानुसार, रोहितने इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीमुळे रणजी ट्रॉफीमध्ये यापुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने मुंबई संघ व्यवस्थापनालाही कळवले आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता यापुढे रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या पुढील फेरीत खेळणार नाही.दुसरीकडे, यशस्वी जैस्वालही मुंबईच्या पुढील रणजी सामन्यात दिसणार नाही. इंग्लंडची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो भारतीय संघाचा एक भाग आहे. त्यामुळे तोदेखील भारतीय संघासोबतच सराव करताना दिसेल.

टीम इंडियाची कमाल, मारला विजयाचा चौकार; उपांत्य फेरीत प्रवेश दिमाखदार

रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा वनडे क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितने मुंबई रणजीतून आपले नाव मागे घेतले आहे. रोहित शर्माने जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी सामना खेळला. या सामन्यातून कसोटीतील हरवलेला फॉर्म परत मिळवण्याचे त्याचे ध्येय होते. मात्र दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. त्याला या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ ३ धावा तर दुसऱ्या डावात २८ धावा करता आल्या. मुंबई संघाचा पुढील सामना मेघालयशी ३० जानेवारीपासून होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -