Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीभारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पाच हजार कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम;...

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, पाच हजार कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम; चित्ररथातून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. कर्तव्य पथावर विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन झाले. पहिल्यांदाच पाच हजार कलाकारांनी कर्तव्य पथावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बिरसा मुंडा यांना १५० व्या जयंती निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. सुमारे अकरा मिनिटांच्या ‘जयति जय मम् भारतम्’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली. यंदाच्या संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांमध्ये एक भारतीय संविधानाशी संबंधित होता. भारत सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संविधानाचा चित्ररथ साकारला होता. या चित्ररथातून मोदी सरकार आले तर संविधान बदलेल या विरोधकांच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन, कर्तव्यपथावर जोरदार तयारी, अमेरिकेने दिल्या शुभेच्छा

यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे शाही पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील दहा हजार जणांना विशेष आमंत्रण होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, अनेक देशांचे राजदूत तसेच अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.

मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

कर्तव्य पथावर परंपरेनुसार लष्कराने संचलन केले. कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. चित्ररथांनी सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक कलाकारांना कर्तव्य पथावर कला सादर करण्याची संधी मिळाली. लोककला, आदिवासी नृत्य प्रकार यांनाही संचलनात मानाचे स्थान मिळाले. युवा शक्ती, महिला शक्ती, भारताची कलेची थोर परंपरा यांचे सादरीकरण करण्यात आले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित ‘विकसित भारत: विरासत भी विकास भी’ या नृत्यातून बिरसा मुंडा यांना १५० व्या जयंती निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. सुमारे अकरा मिनिटांच्या ‘जयति जय मम् भारतम्’ या सुभाष सहगल यांनी लिहिलेल्या गीताला शंकर महादेवन यांचे संगीत आणि हरिश भिमानी यांचे पार्श्वसंगीत लाभले. या गाण्याने उपस्थितांची मनं जिंकली. कर्तव्य पथावरील सादरीकरणासाठी राष्ट्रीय नाटक अकादमीने कलाकारांना मार्गदर्शन केले होते.

केंद्र सरकारकडून शौर्य, सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा; महाराष्ट्र पोलीस दलाला ४८ राष्ट्रपती पदके जाहीर

परंपरेनुसार कर्तव्य पथावरील संचलनानंतर आकाशात विमान आणि हेलिकॉप्टर यांच्या चित्तथरारक कसरती झाल्या. यात २२ लढाऊ विमानांसह ११ मालवाहक विमानांचा ताफा तसेच सात हेलिकॉप्टरचा ताफा सहभागी झाला होता.

याआधी प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आलेल्या सर्वांचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या वेशभूषेने वेधून घेतले. पंतप्रधान मोदींनी यंदाच्या सोहळ्यासाठी चॉकलेटी रंगाचा बंद गळ्याचा कोट घातला होता. डोक्यावर केशरी रंगाचा फेटा खुलून दिसत होता. या फेट्यात लाल आणि पिवळ्या रंगछटांचे छान मिश्रण दिसत होते.

पंतप्रधान मोदींनी परंपरेनुसार सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन वीरांना सलामी दिली. वीर जवान ज्योतीसमोर मौन पाळले. परंपरेनुसार वीरांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

मोदींनी सोशल मीडियाद्वारे देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आपल्याला संविधानाच्या चौकटीत राहून भारताला समृद्ध आणि सशक्त राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी प्रेरणा देतो; असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. लोकशाही मूल्यांना जपत भारत विकास करेल आणि हा विकास सर्वसमावेशक असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -