Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीWadkhal-Alibagh Road : वडखळ-अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलवी सुरू

Wadkhal-Alibagh Road : वडखळ-अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलवी सुरू

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. अलिबाग-वडखळ या मार्गाचा दहा वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला; परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हेच अद्याप प्रशासनाकडून निश्चित झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाविषयी या बाबी माहिती आहेत का ?

रस्त्याच्या कामाबाबत दाद कोण?

मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यासाठी वडखळ-अलिबाग हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. या मार्गावर नेहमी रहद्दारी असल्याने त्याचे चौपदरीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
अलिबागचे माजी आमदार सुभाष (पंडितशेट) पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे.

रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे

रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला.
मात्र हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. राजपत्रात नोटीफिकेशन प्रसिध्द झाले की महामार्गाची हस्तांतरण होते. तसे नोटीफिकेशन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे अलिबाग- वडखळ जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे असे सांगत महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर आपल्या विभागाची जबाबदारी झटकून टाकतात, तर त्याचवेळेला महामार्ग आमच्या ताब्यात अद्याप आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होत नाही तोवर आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही, असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग पेणचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड सांगतात. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे हेच अद्याप प्रशासनाला समजलेले नाही.

शहराच्या वेशीवर मोठमोठे खड्डे

अलिबाग शहराच्या वेशीवर या महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, वाहन चालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत. सुट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी तास ते दीड तास वेळ लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झुडपे काढायची कोणी हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -