Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीUday Samant : ...अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!

Uday Samant : …अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!

छावा चित्रपटाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा बहुचर्चित सिनेमा ‘छावा’ (Chhaava) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दोन दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवली आहेत. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही छावा चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Crime : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने महिलांच्या टोळीने केली चोरी!

‘धर्मरक्षक,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे, छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही’, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

तसेच चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -