डोंबिवली : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने चार ते पाच महिलांच्या टोळीने रेकी करत चोरी केल्याची घटना शहाडमधील नवरंग सोसायटीत घडली. या टोळीने बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड केले लंपास केली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण मधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी जाणाऱ्या ६ जणांवर काळाचा घाला
शहाड पश्चिम परिसरातील स्टेशनच्या बाजूला लागून असलेल्या नवरंग सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर ईश्वर अडांगळे यांच्या घरात चोरीची झाली. आपल्या घरात गेले असता दरवाज्याचे टाळे तोडलेले दिसले. घरात गेल्यावर मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह पाच हजारांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. सोसायटीतील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पहाटे आठ वाजता चार ते पाच महिलांची टोळी इमारतीत शिरताना दिसल्या. त्यांनी घराची रेकी करून टाळे फोडले आणि मौल्यवान वस्तू घेऊन करून पोबारा केला. अडांगळे कुटुंबाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलांच्या टोळीचा शोध घेतला जात आहे.