मुंबई : मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील ६९० रिक्तपदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आल्यानंतर आता यातील पात्र उमेदवारांच्या ९ फेब्रुवारी आणि २ ते ९ मार्च २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/ वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील ही ६९० रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याकरता आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणूक यापूर्वीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून शासनाच्या मान्यतेनंतर आचारसंहितेच्या आधीच याची जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यातील अटी व शर्तीनुसार ऑनलाईन परीक्षा घेऊन अभियंत्यांची भरती केली जाणार असे महापालिका प्रशासनाने यापूर्वीच जाहिर केले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता, (सिव्हील)- २५० पदे, कनिष्ठ अभियंता (यांत्रिक व विद्युत) – १३० पदे, दुय्यम अभियंता (सिव्हील)- २३३ पदे, दुय्यम अभियंता, (यांत्रिक व विद्युत) -७७ ही पदे भरण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात जाहिरात प्रदर्शित करून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते.
अर्जांची छाननी व पडताळणी झाल्यांनतर ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक महापालिकेच्या नगर अभियंता विभागाने जाहीर केले. येत्या ९ फेब्रुवारी रोजी दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) आणि ३ व ८ मार्च रोजी कनिष्ठ अभिंयता (स्थापत्य अर्थात सिव्हील) तसेच ९ मार्च रोजी दुय्यम अभियंता (स्थापत्य अर्थात सिव्हील) या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून या ऑनलाईन परीक्षेसाठी उदवारांना उपस्थित राहण्याकरता आवश्यक असलेले प्रवेशपत्र मुंबई महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in/forprospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाईल.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…