मुंबई : नुकतेच एसटी महामंडळाने एसटीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सोयीस्कर असणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचा प्रवासही महाग होणार आहे. १ फेब्रुवारीपासून रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ लागू होणार आहे. (Taxi -Auto Fare Hike)
Narendra Chapalgaonkar : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन!
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून रिक्षाचे भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये तर टॅक्सीचे भाडे २८ वरून ३१ रुपये होणार आहे.
कूल कॅबचीही दरवाढ
मीटर रिक्षा आणि टॅक्सीसोबतच कूल कॅबचेही दर २० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. कूल कॅबसाठी पूर्वीचे प्रतिकिमी भाडे २६.७१ रुपयांवर ३७.०२ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे कूल कॅबसाठी दीड किमीपर्यंतच्या प्रवासासाठी आता ४० रुपयांऐवजी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रतिकिमीसाठी ३७ रुपये मोजावे लागतील.