Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीNarendra Chapalgaonkar : एक सिद्धहस्त साहित्यिक आपल्यातून निघून गेला!

Narendra Chapalgaonkar : एक सिद्धहस्त साहित्यिक आपल्यातून निघून गेला!

नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना

मुंबई : ज्येष्ठ विचारवंत, सिद्धहस्त लेखक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच त्यांच्या निधनाने एक सिद्धहस्त साहित्यिक आपल्यातून निघून गेला आहे, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Local Update : कर्नाक आणि मिठी नदीच्या पूल दुरुस्तीसाठी घेतलेल्या विशेष ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेल्या न्यायमूर्ती चपळगावकर यांनी मराठी साहित्य, भाषा, संस्कृती यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न केले. मराठवाड्याच्या या सुपुत्राने सामाजिक, न्याय विषयांवर तसेच व्यक्तिचित्रण, ललित लिखाण केले. आपल्या वैचारिक लिखाणातून समाजाला नेहमी जागृत आणि ज्ञानी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने लेखणीच्या जोरावर समाजाला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ कायमचा आपल्यापासून दूर निघून गेला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – अजित पवार

“ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे. आदरणीय नरेंद्र चपळगावकर सरांसारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे.

कायद्याचे अभ्यासक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्याने समाजातील घडामोडीचा समतोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. वैचारिक निष्ठा आणि बांधिलकी जपत राजकीय, सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे, साहित्यातून आपली भूमिका ठामपणे मांडणारे लेखक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. ते मराठवाड्याचे सुपुत्र होते. मराठवाड्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि लेखांमध्ये त्यांच्यातला विचारवंत ठळकपणे दिसतो. देशाचा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्तीसंग्रामातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी लिहिलेलं ‘गांधी आणि संविधान’ पुस्तक संविधान आणि गांधीविचारांचं अलौकिक दर्शन घडवणारं आहे. वर्ध्याला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात साहित्यिक आणि राजकीय नेतृत्वं दोघांच्याही जबाबदाऱ्यांवर त्यांनी केलेलं भाष्य सर्वांसाठी मार्गदर्शक ठरलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -