
मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व भागात आग लागल्याची बातमी समोर आले आहे. आज सकाळी ११ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. गोरेगाव पूर्वेतील रहेजा बिल्डिंगजवळील खडकपाडा फर्निचर मार्केट येथील ५-६ गाळ्यांमध्ये आग लागली आहे.

मुंबई : लग्नाच्या तब्बल २० वर्षानंतर वीरेंद्र सेहवागचा घटस्फोट होणार अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर तसेच माध्यमांमध्येही सुरू आहे. यामुळे ...
आग विझविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये ८ अग्निशमन इंजिन, १ वॉटर क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (WQRV), १ क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (QRV), ५ जंबो टँकर (JT), ३ अॅडव्हान्स्ड वॉटर टँकर (AWTT), अग्निशमन रोबो युनिट, एक ब्रीथिंग अपरेटस (BA) व्हॅन यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एक डिव्हिजनल फायर ऑफिसर (DFO), एक अॅडिशनल डिव्हिजनल फायर ऑफिसर (ADFO), तीन सिनियर स्टेशन ऑफिसर (सिनियर SO) आणि तीन स्टेशन ऑफिसर (SO) यांच्यासह वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी घटनास्थळी उपस्थित आहेत.
दरम्यान, आतापर्यंत आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.