मुंबई : पहिल्या प्रेमाची अनुभूती अनेकांनी कधी ना कधी घेतलेलीच असते. पहिल्या प्रेमाची आठवण विसरणं अनेकांना कठीण जातं. त्यामुळे आयुष्यात पुढे जाता अनेकजण या आठवणी देखील पुढे घेऊन जातात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ (Ilu Ilu) ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
बॉलीवूड गाजवलेली प्रसिध्द अभिनेत्री एली आवरामचा चित्रपट ‘इलू इलू’ येत्या ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा नितीन विजय सुपेकर यांची असून छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांनी केले आहे.
एली सोबत वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत.
दरम्यान, ‘इलू इलू’ चित्रपटातील मनाचा ठाव घेणारी ‘इलू इलू’, ‘गुलाबी गुलाबी’, ‘सोडव रे देवा’ ही तीनही गाणी सध्या गाजतायेत. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…