डेहराडून : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये आज, शुक्रवारी सकाळी भूकंपाचे तीन धक्के बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी मोजण्यात आली. हा भूकंप भूगर्भात ५ किलोमीटर खोलीवर झाल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले.
उत्तरकाशीला आज सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले. यामुळे लोक घाबरून घराबाहेर आले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. त्याचे केंद्र उत्तरकाशीत होते. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे होते. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, उत्तरकाशीत सकाळी ७.४१ वाजता भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. यानंतर आणखी एक धक्का बसला. तर सकाळी ८ वाजून १९ मिनीटांनी भूकंपाचा तिसरा धक्का बसला. सलग बसलेल्या या भूकंपांच्या धक्क्यामुळे लोक घराबाहेर पडले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…