पुणे : लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही,अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्याने, राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीनी आता राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून ज्या अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्या लाडक्या बहिणींकडे मिळालेले पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला होता. काही महिला स्वत:हून पैसे करत आहेत, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असेही आदिती यांनी म्हटले होते. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, सरकारकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात शासनाची भूमिका मांडत, कुठलीही रिकव्हरी नाही,असे स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana : कामाठीपुरात बांगलादेशी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ!
लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरी पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून कोणत्याही स्वरूपात पैशाची रकव्हरी होणार नाही, असे एका वाक्यात उत्तर अजित पवारांनी सांगून टाकले.