सावंतवाडी : शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण करत असताना डांबरीकरणानंतर मारण्यात येणाऱ्या ग्रिटमध्ये डस्टचे प्रमाण जास्त असल्याने होत असलेल्या धुरळ्यामुळे सावंतवाडीकर नागरिकांसह प्रवासी देखील त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराची मनमानी व पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या थेट आरोग्याशीच हा खेळ मांडला गेला असून त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनावर कोणाचाच अंकुश नसल्यामुळे आता दाद मागायची तर ती कोणाकडे असावा नाही नागरिक उपस्थित करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी शहरातील बाजारपेठेत रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले होते. यावेळी संबंधित ठेकेदाराकडून कामाचा दर्जा राखला न गेल्याची तक्रार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच डांबरीकरण झाल्यावर त्यावर टाकण्यात येणाऱ्या ग्रिटमध्ये डस्टचे प्रमाण जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात धुरळा झाल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसह नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. या विरोधात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी आवाज देखील उठविला होता. मात्र, आजतागायत त्यावर कोणतीही उपाययोजना केली न गेल्यामुळे नागरिकांना त्या धुळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच दोन दिवसापासून सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात काही वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या गॅस पाईप लाईनसाठी खोदलेल्या रस्त्याचे नूतनीकरण काम हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी देखील तशाच प्रकारे ठेकेदाराकडून ग्रिट मारण्यात आल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नाका तोंडात धुरळा जात असल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या विरोधात वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून पालिका प्रशासन जाणून-बुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे का असं संतप्त सवाल नागरिक तसेच वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे.
सद्यस्थितीत पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असल्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नसल्यानेच हे प्रकार घडत आहेत असा थेट आरोप देखील नागरिकांनी केला असून ठेकेदाराची मनमानी व पालिकेचा अक्षम्य दुर्लक्ष याला जबाबदार असून आता न्याय तरी कोणाकडे मागायचा असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…