Friday, August 15, 2025

कणकवली, बांदा, कुडाळ, ओरोस परिसरातल्या नद्यांमधील गाळ काढण्याची कामे १ फेब्रुवारीपासून सुरु करणार

कणकवली, बांदा, कुडाळ, ओरोस परिसरातल्या नद्यांमधील गाळ काढण्याची कामे १ फेब्रुवारीपासून सुरु करणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे झटपट निर्णय व तात्काळ अंमलबजावणी

सिंधुनगरी : सिंधुदुर्गातील पूर परिस्थिती रोखण्यासाठी व जनतेला दिलासा देण्यासाठी संभाव्य ठिकाणे निश्चित करण्यासाठी चार दिवसापूर्वी बैठक झाली, पुन्हा आज शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. व ही ठिकाणे निश्चित करून १ फेब्रुवारीपासून ही गाळ उसपण्याची कामे सुरू करण्याचे आदेशही झाले. उपलब्ध दोन कोटी आणखी अडीच कोटी असा साडेचार कोटी देणार, शासकीय यंत्रणे बरोबरच खाजगी यंत्रसामग्रीचा वापर करून गाळ उपसण्याचा कामाला गती देण्याचे आदेशही दीले. पालकमंत्री नितेश राणे यांची झटपट निर्णय व तात्काळ अंमलबजावण्याची प्रथा या निमित्ताने प्रथम पहायला मिळाली!

गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, मात्र पुढच्या काळात सिंदुर्गात पूर परिस्थिती नकोय! जास्त पाऊस झाला तर ज्या ठिकाणी गाळ आहे तो काढा व जिल्हावासिया जनतेला दिलासा द्या. असे आदेश शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. दोन कोटी निधी जिल्हा नियोजन विभागाकडे उपलब्ध आहे आणखी अडीच कोटी निधी उपलब्ध करून देतो अशी ग्वाही त्यांनी दिली.

दोन कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात कणकवली मधील जाणवली नदी उर्सुला हायस्कूल, तेरखोल नदी बांदा, आंबेडकर नगर कुडाळ व ख्रिश्चन वाडी पीठ ढवळ नदी या चार ठिकाणची कामे १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आदेश.

या वर्षी सिंधुदुर्गात पुर परिस्थीती नकोय, जिल्हात गेल्या तिन वर्षात पूर आलेल्या गावांचा अभ्यास करुन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानी पूर परिस्थितीची ठिकाणे केली निश्चित. उपलब्ध २ कोटीतून पहिले चार कामे हाती कामे पहिली हाती. एकुण ९ कामे पूर्ण करणार.आणखी अडीज कोटी निधी आणखी उपलब्ध करून एकुण साडेचार कोटी निधी उपलब्ध करुन देणार.

केवळ शासकीय पैशातून गाळ काढून जिल्ह्यातील पूर परिस्थिती थांबविता येणार नाही. अनेक नद्या गाळाने भरले आहेत. अनेक निवेदने माझ्याकडे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांसाठी किंवा रस्त्याच्या कामांसाठी त्या त्या ठेकेदारांमार्फत हे गाव उपसण्याचे काम झाले तर गाळमुक्त नद्या होतील व विकास कामांना ही गती मिळेल याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. व त्यानुसार जिल्ह्यातील विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या मशिनरीचा वापर करून घ्यावा असे निर्देशही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

Comments
Add Comment