भंडारा : भंडारा येथील दारु गोळा निर्मितीचं काम केलं जाणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून आतापर्यंत या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Bhandara News)
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल
यासंदर्भातील माहितीनुसार, भंडारा जवाहरनगर येथील दारूगोळा कारखान्याच्या आर. के. सेक्शनमध्ये स्फोट झाला तेव्हा तिथे १४ कामगार कार्यरत होते. स्फोट झाल्यानंतर इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ११ कामगार दबल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान घटनास्थळावर अग्निशमन पथक पोलीस विभाग तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत. तसेच मदत म्हणून एसडीआरएफचे पथक देखील पाचरण करण्यात आले आहे.
View this post on Instagram
या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ट्विटरवर पोस्ट करत महत्वाची माहिती दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून १३ ते १४ कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (Bhandara News)
There is a news of incident where 13-14 workers are trapped due roof collapse caused by an explosion at the ordnance factory in Bhandara.
5 workers have been safely rescued.
Bhandara Collector and SP are at the site and ensuring immediate rescue measures and all required support.… https://t.co/sMssvTcjIh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 24, 2025