Tuesday, July 1, 2025

Sidharth Chandekar : बायको, तू लढ! बाकी तेरा आदमी…;सिद्धार्थची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायको मितालीसाठी खास पोस्ट

Sidharth Chandekar : बायको, तू लढ! बाकी तेरा आदमी…;सिद्धार्थची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायको मितालीसाठी खास पोस्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'फसस्टक्लास दाभाडे' या सिनेमाची जोरदार चर्चा केली जात आहे.या सिनेमात सिद्धार्थ आणि मिताली स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.आज २४ जानेवारी रोजी फसस्टक्लास दाभाडे हा हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमा रिलीज झाला आहे. याचदिवशी सिद्धार्थ आणि मिताली या जोडीचा लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने सिद्धार्थने मितालीसाठी इन्स्टाग्रावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.






सिद्धार्थने आपल्या पोस्ट मध्ये लिहलं की, बायको! आज आपल्या anniversary ला आपल्या दोघांचा पहिला सिनेमा release होतोय. किती भारी! मी कायम तुझी अभिनय करण्याची भूक, धडपड आणि तडफड पाहत आलोय. मला कायमच तुझा अभिमान होता, पण तुझं हे काम बघून तर मला जरा जास्तच अभिमान वाटतोय. तू एक सुंदर अभिनेत्री आहेस, आणि तू आईशप्पथ कडक काम केलयस. तुझ्या कडे इतकं यश येवो, इतकं ऐश्वर्यं येवो, की तुला मागे वळून बघायची गरजच भासणार नाही. मी नेहमीसारखा खंबीरपणे तुझ्या मागे उभा आहे. तू लढ! बाकी तेरा आदमी देख लेगा! Happy Anniversary! – नवरा’ अशी पोस्ट सिद्धार्थने शेअर केली आहे.



सिद्धार्ध चांदेकर आणि मिताली मयेकर हे एकमेकांना अनेक वर्ष डेट करत होते. अखेर २४ जानेवारी २०२१ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. या दोघांचाही चाहता वर्ग मोठा आहे. दोघेही आपल्या चाहत्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करत असतात. अशातच आता दोघांचा एकत्र कम केलेला सिनेमा रिलीज झाला आहे. यामुळे त्यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >