Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीNilesh Rane : कोकणात महायुतीची पुन्हा एकदा तोफ धडाडली; नगराध्यक्षपदीही महायुतीचाच शिलेदार

Nilesh Rane : कोकणात महायुतीची पुन्हा एकदा तोफ धडाडली; नगराध्यक्षपदीही महायुतीचाच शिलेदार

सिंधुदुर्ग : कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत महाविकास आघाडीच्या माजी आमदार वैभव यांना मोठा झटका दिला आहे. या विजयानंतर महायुतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल

कुडाळमध्ये आमदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत नगरपंचायतीपदी भाजपच्या नगराध्यक्ष निवडून आणला आहे. भाजपच्या प्राजक्ता बांदेकर शिरवळकर यांनी मविआच्या सई काळप यांना पराभूत केलं आहे. निवडणुकांआधी महायुतीच्या पारड्यात मविआकडे ९ तर महायुतीकडे ८ नगरसेवक होते. मात्र आमदार निलेश राणेंनी लढवलेल्या कल्पकतेमुळे मविआचा एक नगरसेवक फुटण्यात यशस्वी झाले.

Ashish Shelar : अरेरे! शेलारांनी तर उधोजींची उरलीसुरली काढून टाकली!

पुढच्या सर्व निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून आम्ही विजय मिळवू अशा प्रकारचा दावा आमदार निलेश राणे यांनी केला. यानंतर आमदार निलेश राणे म्हणाले अडीच वर्ष कुडाळ शहराचा विकास रखडला होता आणि म्हणूनच इथला महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटला आहे. आम्हाला राजकारण नाही तर कुडाळचा विकास महत्त्वाचा आहे असेही आमदार निलेश राणे म्हणाले. या विजयानंतर आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष केला. आगामी काळात होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हापरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाची निवडणूक नांदी ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -