
पुणे : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित अभिनेता विकी कौशल (Viky Kaushal) याचा 'छावा' (Chhaava) चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे भरभरून कौतुक होत आहे. मात्र, चित्रपटातील ट्रेलरच्या एका प्रसंगामुळे पुण्यातील शिवप्रेमी नाराज झाले असून मराठा क्रांती मोर्चातर्फे आज पुण्यात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारा : भंडारा येथील दारु गोळा निर्मितीचं काम केलं जाणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...
'छावा' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज व येसूबाई यांचे नाचतानाचे दोन प्रसंग हे आक्षेपार्ह असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. त्यामुळे आज सकाळी १० वाजल्यापासून पुण्यात लाल महाल येथे मराठा क्रांती मोर्चाकडून चित्रपटाचा निषेध करण्यात येत आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्वरित हे दोन्ही प्रसंग चित्रपटातून वगळावे, अन्यथा मराठा समाज आणि शिवप्रेमी हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही’, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, बहुप्रतीक्षित ' छावा' या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'छावा' हा चित्रपट पुढील महिन्यात १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. आता प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडतो हे पाहणे रंजक ठरेल.