

Ashish Shelar : अरेरे! शेलारांनी तर उधोजींची उरलीसुरली काढून टाकली!
तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल वळ आहेत, ते मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा! मुंबई : अंधेरीत झालेल्या मेळाव्यात अमित शाह यांच्यावर टीका ...
भाजपाचे संपर्क प्रमुख सरकार आणि स्थानिकांमधील दुवा म्हणून पक्षाच्यावतीने काम करतील. मित्र पक्षांच्या पालकमंत्र्यांचे निर्णय भाजपासाठी त्रासदायक ठरू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतील. भाजपाच्या या हालचाली म्हणजे मित्र पक्षांवर राजकीय कुरघोडीचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कणकवली, बांदा, कुडाळ, ओरोस परिसरातल्या नद्यांमधील गाळ काढण्याची कामे १ फेब्रुवारीपासून सुरु करणार
पालकमंत्री नितेश राणे यांचे झटपट निर्णय व तात्काळ अंमलबजावणी सिंधुनगरी : सिंधुदुर्गातील पूर परिस्थिती रोखण्यासाठी व जनतेला दिलासा देण्यासाठी ...
निवडणूक काळात देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण करण्यात संपर्क प्रमुख महत्त्वाची भूमिका बजावतील. जनता आणि सरकार यांच्यातला दुवा म्हणून ते काम करतील; असे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजपाच्या मंत्र्यांचे सहायक म्हणून त्यांच्या कार्यालयात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक होणार आहे; असेही बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र भाजपाच्या मुंबईतील मुख्यालयात पक्षाचे मंत्री दर १५ दिवसांनी एक जनता दरबार घेणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात जा आणि रात्रभर तिकडे मुक्काम करा; असेही मंत्र्यांना सांगण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले. आदिवासी जिल्ह्यांमध्ये वेगळ्या पद्धतीनं हा उपक्रम राबवणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

Nilesh Rane : कोकणात महायुतीची पुन्हा एकदा तोफ धडाडली; नगराध्यक्षपदीही महायुतीचाच शिलेदार
सिंधुदुर्ग : कोकणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोकणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार ...
मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये
राज्यातील सर्व मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय महसूल आयुक्तांना दिले आहेत. शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देशही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले. दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करण्याबाबात प्रस्ताव सादर करा असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.