मुंबई : रणजी करंडक स्पर्धेत फॉर्म मिळवण्यासाठी रोहित शर्माने खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल गुरुवारी (२३ जानेवारी) ३ धावांवर बाद होत फ्लॉप ठरला. मात्र, आज शुक्रवारी (२४ जानेवरी) रोहित वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने आक्रमक फलंदाजी करत उमर नजीरच्या एका षटकात ६,४,४ असे फटके मारले.
रोहित आज शुक्रवारी (२४ जानेवरी ) मैदानात आक्रमक मूडमध्ये दिसला.रोहितने उमरच्या चेंडूवर पुल शॉट मारत चेंडूला मैदानाबाहेर भिरकावला. त्यानंतर त्याने नबीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रोहितने प्रथमच डावात २० हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित- यशस्वीने १० षटकांत ५२ धावा जोडल्या. रोहित २८ धावांवर नाबाद आहे आणि त्यात ३ षटकार व २ चौकारांचा समावेश आहे. यशस्वीनेही नाबाद २३ धावा केल्या आहेत.
Kumbha Mela 2025 : कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेगाडी उपलब्ध करून द्या- नवनीत राणा
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू काल गुरुवारी (२३ जानेवारी) जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांसमोर अपयशी ठरले होते.जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या या सामन्याच्या पहिल्या डावात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने शानदार फलंदाजी केली, त्याने ५७ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या आणि तो या संघाचा सर्वोत्तम धावा करणारा फलंदाजही ठरला. याशिवाय, तनुष कोटियनने शेवटच्या क्षणी २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि त्याच्या फलंदाजीमुळे मुंबईची धावसंख्या १२० धावांपर्यंत पोहोचली.
Rohit Sharma smashed 6,4,4 in an over.
– The Hitman has arrived in Ranji! pic.twitter.com/jhozVH5Pol
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2025
मुंबईच्या आग्रमक गोलंदाजीविरुद्ध जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात २०६ धावा केल्या. जम्मू-काश्मीरकडून शुभम खाजुरीयाने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर अबिद मुश्ताकने ४४ धावा झळकावल्या. मुंबईकडून मोहित अवस्थीने सर्वाधिक ५ विकेट्स पटकावल्या. तर शार्दुल ठाकूर आणि शाम्स मुलानी याने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.