Friday, July 4, 2025

Donald Trump : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी

Donald Trump : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी

वॉशिंग्टन : युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नवीन कर लादले जातील, असा धमकीवजा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाला दिला आहे.


सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी मंगळवारी थोडा बदल केला, ज्यामध्ये ते म्हणाले की, जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वाटाघाटी करण्यास नकार दिला तर ते रशियावर निर्बंध लादतील.


जर आपण लवकर वाटाघाटी केल्या नाहीत, तर माझ्याकडे अमेरिकेत किंवा इतर सहकारी देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोणत्याही रशियन वस्तूंवर जास्तीचा कर, आयात शुल्क आणि निर्बंध लादण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही ट्रप्प म्हणाले. वॉशिंग्टन येथील रशियाचा दुतावास किंवा न्यूयॉर्क येथील मिशन टू युनायटेड नेशन्सने या प्रकरणावर कुठलेही भाष्य केलेले नाही.



दरम्यान,फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यानंतर बायडन यांच्या प्रशासनाने यापूर्वीच रशियावर असंख्य निर्बंध लादले आहेत. ज्यामध्ये रशियाच्या बँकिग, संरक्षण, उत्पादन, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील हजारो संस्थांचा समावेश आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच यूएस ट्रेझरीने रशियाला मोठा झटका दिला आहे. ऑइल आणि गॅस उत्पादक गॅझप्रॉम नेफ्ट आणि सर्गुटनेफ्तेगॅस यांच्यावर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामाध्यामून रशियाच्या ऊर्जा क्षेत्रातील महसूलाला मोठा धक्का बसला आहे.

Comments
Add Comment