Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजलॉस एँजेलिसमधील वणवा भडकला, आणखी ५० हजार जणांच्या स्थलांतराचे आदेश

लॉस एँजेलिसमधील वणवा भडकला, आणखी ५० हजार जणांच्या स्थलांतराचे आदेश

लॉस एँजेलिस : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एँजेलिसच्या जंगलात लागलेला वणवा पुन्हा भडकला आहे. वणवा झपाट्याने पसरत असल्यामुळे आणखी ५० हजार नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. नव्याने भडकेल्या ह्युजेस फायर नावाच्या वणव्यामुळे अवघ्या काही तासांत ९४०० एकरचे जंगल जळून खाक झाले आहे.

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार

नव्याने भडकलेला वणवा विनाशकारी ईटन आणि पॅलिसेड्स पासून सुमारे ४० किमी. अंतरावर आहे. मागील तीन आठवड्यांपासून वणव्यामुळे लॉस एँजेलिसचे जंगल नष्ट होत आहे.जंगलातील पॅलिसेड्समुळे २३ हजार ४४८ एकर तर इटनमुळे १४ हजार २१ एकर जंगल जळून खाक झाले आहे. पॅलिसेड्स वणवा ६८ टक्के नियंत्रणात आली आहे तर ईटन वणवा ९१ टक्के नियंत्रणात आली आहे. पण नव्याने भडकेला वणवा अद्याप नियंत्रणात आलेला नाही.

ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाचे स्थान

याव्यतिरिक्त, सॅन दिएगोमधील लिलाक वणवा ९५ टक्के नियंत्रणात आहे. रिव्हरसाईडमधील क्ले फायर नावाचा वणवा ४५ टक्के नियंत्रणात आहे. या व्यतिरिक्त सॅन दिएगो काउंटी येथे सेंटर फायर नावाचा वणवा भडकला आहे. या वणव्याची सुरुवात बुधवार २२ जानेवारी रोजी झाली. या वणव्याने चार हजार एकरांपेक्षा जास्त जंगल जळून खाक झाले आहे.

तुर्कीच्या स्की रेसॉर्टमध्ये लागली आग, ६६ जणांचा मृत्यू

ज्या भागांमध्ये वणवा पेटला आहे त्या भागांमध्ये ताशी ४० ते ६० मैल वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्यामुळे वणवा नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. पुढील काही तास तर ताशी ७० मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग वाढला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याचा धोका आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -