
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरीयाणामधील सोनीपत येथे श्रेयस आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ या दोघांविरोधात एका घोटाळ्यात एफआयआर दाखल केला गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमधील एका कंपनीचे मार्केटिंग प्रमोशन श्रेयस तळपदेने केलं होतं. तसेच या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी श्रेयस आणि आलोकनाथ यांनी जाहिरात केली होती. त्यामुळे अनेक लोकांनी डोळे बंद करून या कंपनीवर विश्वास ठेवत गुंतवणूक केली. मात्र कंपनीने ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेत पळ काढला आहे. त्यामुळे याप्रकरणी श्रेयस आणि आलोकनाथ यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्यासह ११ जणांची नावे आहेत.

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता शूटिंग पूर्ण न करताच निघाल्याने निर्मात्याने अभिनेत्याला ...
इंदोरमधील या कंपनीमध्ये जवळपास ६ वर्षांपासून लोकांनी गुंतवणूक केली होती. चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अनेक मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार ठेवून या कंपनीत लोकांना एजेंट बनवून घेतलं गेलं. सुरुवातीला काही लोकांना कंपनीने पैसेदेखील दिले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे लोकांनी थेट कंपनीच्या ऑफिसात धाव घेतली. मात्र ऑफिसला टाळं असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आला.या मार्केटिंग कंपनीचं प्रमोशन श्रेयस तळपदेनेही केलं होतं. या प्रकरणी पंजाब आणि हरीयाणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.