Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीBollywood Daily Soaps : शूटिंग पूर्ण न करताच निघालेल्या अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण

Bollywood Daily Soaps : शूटिंग पूर्ण न करताच निघालेल्या अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता शूटिंग पूर्ण न करताच निघाल्याने निर्मात्याने अभिनेत्याला मालिकेच्या सेटवरच मारहाण केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्यानं मालिकेच्या निर्मात्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Palghar Update : इअरफोनचे वेड विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर!

‘जय माँ लक्ष्मी’ या लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर निर्मात्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता शान मिश्राला मारहाण केली आहे. शान ‘जय माँ लक्ष्मी’ या मालिकेत श्री विष्णुंची भूमिका साकारत होता. शानच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने शानने निर्मात्यांना लवकर पॅकअप करण्याची विनंती केली. शानच्या हाताची दुखापत बघता डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करायला सांगितला होता मात्र शूटिंग मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून शानने शूटिंगला जाण्यास तयारी दाखवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Telly Talk (@tellytalkindia)

Chhaava : शिवप्रेमी नाराज! ‘छावा’ चित्रपटाला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध 

दरम्यान निर्माता व निर्मात्याच्या पत्नीने शानवर अरेरावीची भाषा करून त्याला मारहाण केली. त्यांच्या या वादाचे शानने त्याच्या फोनमध्ये चित्रीकरण केले. निर्मात्याच्या पत्नीचा उद्धटपणे बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस निर्मात्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -