Ashish Shelar : अरेरे! शेलारांनी तर उधोजींची उरलीसुरली काढून टाकली!

तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल वळ आहेत, ते मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा!


मुंबई : अंधेरीत झालेल्या मेळाव्यात अमित शाह यांच्यावर टीका करणा-या उद्धव ठाकरे यांच्या अब्रूची लक्तरे भाजपा नेत्यांनी काढली आहेत. यात मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तर उबाठाच्या मेंदूतच झोल आहे असे म्हणत त्यांची बोलती बंद करून टाकली आहे.


त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, उध्दव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० चा आहे. त्यामुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जन संघा विषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही.


५ आणि ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी उध्दव ठाकरे यांचे वय २० वर्षे होते. त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि करगोट्यातून इज्जत निसट्याच्या वयात असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उध्दव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता ? १०० वर्षे पुर्ण करणाऱ्या संघावर बोलता?



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला तसेच भाजपा जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करुन दाखवला त्या अमितभाई शाह यांच्यावर बोलता ..?


समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही !!


उद्धव ठाकरे तुम्ही अमितभाई शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात ? कसले? केव्हा ?


आधी तुम्ही तुमचे वडिल म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलैच्या पुरात अडकले होते.. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला "पाठ दाखवून" पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पहा !


कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत. त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा!
मग कळेल जखमा खोल आहेत की, तुमच्या मेंदूतच झोल आहे !! अशा खरमरीत शब्दात शेलार यांनी उबाठांना खडे बोल सुनावले आहेत.

Comments
Add Comment

Tejasvi Ghosalkar : मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ३ राखीव डबे हवेत; भाजप नेत्या तेजस्वी घोसाळकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

Mumbai : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि वाढती गर्दी लक्षात घेता, एक मोठा

Chandrakant Patil : 'राज्यातील विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावे'

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी

Mumbra Railway Accident : मुंब्रा रेल्वे पुलाजवळ लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. चालत्या लोकलमधून पडल्याने 27

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर