Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणमुंढर नं. १ शाळेची स्वरा लांजेकर जाणार नासा, इस्रो भेटीला

मुंढर नं. १ शाळेची स्वरा लांजेकर जाणार नासा, इस्रो भेटीला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत इस्रो भारत व नासा अमेरिका अंतराळ संशोधन भेटीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरिय निवड चाचणी परीक्षेत जिल्हा परिषद शाळा मुंढर नं.१ या ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थिनी स्वरा साक्षी संतोष लांजेकर ही पात्र ठरली. तसेच राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठीसुद्धा तिची निवड झाली आहे.

‘बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो’

स्वराने अत्यंत चिकाटीने व जिद्दीने अभ्यास करून जिल्हा परिषदेने दिलेल्या संधीचे सोने केले. शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कदम यांनी तिला मुलाखत व प्रात्यक्षिक यावर वैयक्तिक मार्गदर्शन केले.पदवीधर शिक्षक वैभवकुमार पवार आणि उपशिक्षक लक्ष्मण पारवे यांनी विज्ञान विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे रवी खांडेकर यांनी प्रयोग, सहभाग यावर मार्गदर्शन केले. मुंढर हायस्कुलचे मुख्याध्यापक अनंत साठे आणि विज्ञान शिक्षक पराग कदम यांनी तिचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली. अंजनवेल हायस्कुलचे मुख्याध्यापक गोरीवले आणि न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेचे मुख्याध्यापक पाटील यांनी शाळेची प्रयोगशाळा प्रयोग,प्रात्यक्षिक करण्यासाठी उपलब्ध करून दिली . पदवीधर शिक्षक सुनील वाघे यांनी मार्गदर्शन केले.आई- वडिलांनी तिचे मनोबल वाढविले. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शुभेच्छा दिल्या.

‘महाराष्ट्राला एनर्जी ड्रिंक्सच्या विळख्यातून वाचवा’

स्वराची जिद्द, चिकाटी, अभ्यासूवृत्ती यामुळे स्वराने हे उत्तुंग असे यशाचे शिखर गाठले आहे.त्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत अध्यक्ष सचिन चाळके, केंद्रप्रमुख विजय निकम, अनंत साठे, पराग कदम, मुख्याध्यापक दशरथ कदम यांच्या हस्ते स्वरा व तिचे आई वडील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पदवीधर शिक्षक वैभवकुमार पवार,उपशिक्षक लक्ष्मण पारवे, मुंढर गावचे पोलीस पाटील नीलेश गमरे, विनायक लांजेकर, प्रभाकर चव्हाण, मानसी शिर्के, रसिका शिर्के, यशवंत लांजेकर आणि अनेक पालक उपस्थित होते. सर्वांनी स्वराला पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -